संजय राऊतांची विधाने ही भरकटलेली आणि गोंधळात असणारी आहेत- प्रविण दरेकर

0
241

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट झाली. त्यावर शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत ‘सरकार पाच वर्षे टिकेल’ असं वक्तव्य केलं होतं. यावरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊत हे फार गोंधळून गेले आहेत. राष्ट्रवादीने जर साथ दिली नाही तर भाजपसोबत जाऊ शकतो, असे संकेतच त्यांनी दिले आहे. पण नेमकं करायचं काय, हेच त्यांना कळत नाही, असा टोला प्रवीण दरेकर यांनी यावेळी संजय राऊतांना लगावला आहे.

संजय राऊतांची विधाने ही भरकटलेली आणि गोंधळात असणारी आहे. आमचे ऐकणार नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला गेलेच आहेत, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला. राष्ट्रवादीने जर साथ दिली नाही, तर भाजपसोबत जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. राऊतांना म्हणजे नेमके काय करायचे, याची कोणतीच जाणीव होत नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर हैदराबादचा विजयी सूर्य’ उगवला; राजस्थानवर 7 विकेट्सने मात

“दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं”

खडसे आणि महाजनांचं मन जुळले; याला शिवसेनेचेही साथ

पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगा, आदित्य ठाकरेचा मला अभियान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here