“कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की”

0
163

मुंबई : भाजप आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्ये थेट कोरोना सेंटरवरच बाचाबाची झाली. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोरोना सेंटरवर हा प्रकार घडला.

कोरोना लसीकरण सुरू असताना लस देण्यावरून दोन्ही पक्षाच्या महिला नेत्या आमनेसामने आल्या. यावेळी दोन्ही महिला नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि दोघींमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

भाजपच्या महिला नेत्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचं माहिती मिळाली आहे. आज सकाळी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. भाजपच्या आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडेकर आणि रंजना पाटील यांची शिवसेना नगरसेविका राजूल पटेल उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी 11.30 च्या सुमारास लस देण्यावरून पटेल आणि लव्हेकर यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमकीनंतर दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे भारती लव्हेकर या आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या”

“सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असं म्हणण्याची वेळ आली”

ठाकरे सरकार, निकम्मा कारभार; नाशिक व्हेंटिलेटर प्रकरणावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“मी 96 कुळी मराठा, कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here