“प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळं निधन”

0
156

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या संदर्भात ट्विट करत अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

गुणी अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना संसर्गाने आज सकाळी निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली. निवृत्ती सैन्य अधिकारी कंवरपाल यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांचे सांत्वन, असं ट्विट अशोक पंडित यांनी केलंय.

कोरोनावर उपचार सुरु असताना बिक्रमजीत कंवरपाल यांची प्राणज्योत मालवली. तसेच बिक्रमजीत कंवरपाल यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज गाजले आहेत. पेज थ्री, रॉकेट सिंग, गाझी अटॅक, टू स्टेट्स यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

पंजाबचा बेंगलोरवर 34 धावांनी विजय

“…तर महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”

वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही,आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल- देवेंद्र फडणवीस

“राज्यातील शाळांना 1 मे पासून सुट्टी जारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here