Home नाशिक वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही,आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल- देवेंद्र...

वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही,आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल- देवेंद्र फडणवीस

नाशिक : “करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध अशी व्यवस्था उभी केली आहे, तशीच राज्याने देखील करायला हवी. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल.” असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“माझ्यापरीने होईल ते मी राज्यासाठी करतच असतो, केंद्र सरकारने रेमडेसिविरचा सर्वाधिक साठा हा राज्याला दिला. ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्राला दिला. जवळ जवळ पहिल्याच खेपेत 1100 व्हेंटिलेटर हे महाराष्ट्राला दिले. आता पीएसए प्लॅन्ट देखील मोठ्याप्रमाणात महाराष्ट्राला दिले. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य व केंद्रामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव अशा प्रकारची अवस्था नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितलं आहे की आज एकत्रितपणे जनतेच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं. म्हणून माझंही मत स्पष्ट आहे कोणी कुणाकडे बोट दाखवणं योग्य नाही, आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आपण करायला हवा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यातील शाळांना 1 मे पासून सुट्टी जारी”

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

सरकारला चूक कळली, राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली मान्य

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सांगा गरिबांनी जगायचं कस?; भाजपचा सवाल