ममता दीदी, तुम्हाला राग काढायचा असेल तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
159

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. दीदी तुम्हाला राग काढायचा तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. वर्धमान इथं आयोजित प्रचार रॅलीत बोलत असताना मोदींनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, पहिल्या 4 टप्प्यात तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांचा एकदा पराभव झाला की, त्या परत कधीच निवडून येणार नाहीत. त्यामुळे दीदी, तुम्ही एकदा गेलात की परत येणार नाहीत, असा टोला पंतप्रधान मोदींनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी”

लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही हे माझं वैयक्तिक मत- बाळासाहेब थोरात

“राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया”

सरकार पाडतील तेंव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; संजय राऊतांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here