Home महाराष्ट्र “गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी”

“गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी”

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे.

या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही., असंही सरकारनं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही हे माझं वैयक्तिक मत- बाळासाहेब थोरात

“राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया”

सरकार पाडतील तेंव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; संजय राऊतांचा टोला

मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती