Home महाराष्ट्र मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, मी बघतो- देवेंद्र फडणवीस

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?

“…तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”

महाराष्ट्रात लोकशाही नसून ‘लॉकशाही’ आहे; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल