एवढी का तणतण करत आहेत?; आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

0
348

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर  संजय राऊतांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय,तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!, असं ट्विट आशिष शेलार यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?;- चित्रा वाघ

ईडीच्या चौकशीला घाबरून नारायण राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेचा हल्लाबोल

“नवी मुंबईत भाजपला धक्का! 3 नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here