Home महाराष्ट्र राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा; स्वाभिमानीतील वाद मिटला

राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा; स्वाभिमानीतील वाद मिटला

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर विधानपरिषदेवर जाण्याच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक यांची नाराजी दूर करण्यात आली.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाला. यावेळी जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवार आल्यावर घेऊ असं आश्वासन दिलं होतं.

दरम्यान, एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. यानंतर स्वाभिमानी संघटनेत या मुद्द्यावर दोन गट पडले. मात्र, अखेर हा वाद चर्चेतून मिटवण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भारत मजबूत आहे, मजबूर नाही- उद्धव ठाकरे

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना शरद पवार आणि सोनियांनी दिल्या ‘या’ सूचना

आम्ही उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला”