मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा नवीन वाद पुन्हा एकदा समोर आला. सोशल मीडियावर स्टारकिड्सविरोधात मोहीम चालवली जात आहे. सुशांतचे चाहते घराणेशाहीविरोधात भाष्य करत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक राम गोपाल वर्माने करण जोहरला पाठिंबा दर्शविला आहे.
करण जोहरवर ज्याप्रकारे आरोप केले जात आहेत, याचा अर्थ लोकांनी फिल्म इंडस्ट्रीला समजूनच घेतलं नाही, असं म्हणत राम गोपोल वर्माने करण जोहरला पाठिंबा दर्शवला आहे.
इंडस्ट्रीत 12 वर्षे राहिल्यानंतर, पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर जर सुशांत इंडस्ट्रीत एकटं वाटल्याने आत्महत्या करू शकतो. तर त्याच्याइतकंही यश संपादन करू न शकणाऱ्या 100 कलाकारांची आत्महत्याही योग्य ठरू शकते, जे काही झालं त्यासाठी करण जोहरवर आरोप करणं म्हणजे तुम्ही अजून फिल्म इंडस्ट्रीला नीट समजू शकले नाही, असं राम गोपाल वर्मांनं म्हटलं आहे.
दरम्यान, जरी करण जोहरला सुशांतशी काही समस्या होती असं समजलो तरी कोणासोबत काम करायचं आणि कोणासोबत नाही याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य करणला आहे, असंही राम गोपाल वर्मा म्हणाले.
WITHOUT NEPOTISM SOCIETY WILL COLLAPSE BECAUSE NEPOTISM(FAMILIAL LOVE ) IS THE FUNDAMENTAL TENET OF A SOCIAL STRUCTURE..Like u shouldn’t love others wife more, u also shouldnt love others children more
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 16, 2020
If Sushant after 12 yrs of fame and money took his life becos he was made to feel like an outsider then a 100 actors suicides per day will be justified who couldn’t reach anywhere near Sushant. If u can’t b happy with what u have u will never be happy with whatever u have.Period!
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांसाठी अनिल देशमुखांनी ‘ही’ मोठी घोषणा”
“अखेर कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं पहिलं औषध सापडलं; WHO नं केलं ‘या’ देशाचं कौतुक”
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार कलाकारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल
जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; पंतप्रधानांचा इशारा