“तुमच्या कानाला आणि हृदयाला त्रास व्हावा म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे”

0
355

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो असं म्हणत राऊतांवर टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, असं म्हटलं होतं. यावर संजय राऊतांनी, त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी आपली नियुक्ती केली असल्याचं म्हणत चंद्रकातं पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, मग ही चांगली गोष्ट आहे. कानाला, डोळ्याला, पोटाला तसंच ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली आहे, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या”

“धक्कादायक! नागपूरमध्ये वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं”

“शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन राऊत यांचा गेम केला”

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here