“शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”

0
417

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर भाजपा नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. यानंतर संजय राऊतांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना!, असं म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?, असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला.

दरम्यान, ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडलं पाहिजे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?;- चित्रा वाघ

ईडीच्या चौकशीला घाबरून नारायण राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेचा हल्लाबोल

“नवी मुंबईत भाजपला धक्का! 3 नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश”

“…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here