आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापुरातील भाजपाचा एक मोठा नेता नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. असं असतानाच कोल्हापूरात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्याबद्दल या चर्चा सुरू असतानाच आज त्यांनी एक मोठं पाऊल उचलल्यामुळे खळबळ माजली आहे. समरजित घाटगे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘कमळ’ चिन्ह हटवलं आहे. समजरजित सिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली का अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपला मोठं खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
ही बातमी पण वाचा : आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत…; राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना
महायुतीचा मेळावा आज कोल्हापूरात पार पडला, त्यानंतर अवघ्या काही वेळातच समरजित घाटगे यांनी हे पाऊल उचलल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ हे कागलचे विद्यमान आमदार असल्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याला या जागेवर महायुतीचं तिकीट मिळणार नाही, या विचाराने भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत…; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
भाजपला मोठा धक्का? ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
“सांगलीच्या बिसूर हायस्कूल, बिसूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ध्वजारोहण संपन्न”