आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहे. लोकसभेसाठी तिकीट जाहीर होताच मोहोळ यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हेच माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : भाजपा-शिवसेना युतीवर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू हा मला सार्थ विश्वास आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने मागील दहा वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची आहे, असंही मोहोळ यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर आम्ही तुमच्यासोबत येतो, निवडणूकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य
अजय महाराज बारस्करांचा, मनोज जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…