आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर दिलेल्या निकालाचा विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर काल (१९ फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला मोठा दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवर (X) प्रतिक्रिया दिली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये, असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : “आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा उद्या एक दिवस असेल”
“मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय निवडणूक आयोगाला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू”, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला सात दिवसात चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर अजित पवार गटाला पुढच्या दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“…तर मी उध्दव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन”
उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी
मनोज जरांगेनं मर्यादा ओलांडली, त्याने आपली औकात ओळखावी; नारायण राणेंचा हल्लाबोल