Home महाराष्ट्र “सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेद्वार?, पंकजा मुंडे यांचं पक्षात स्वागत”

“सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेद्वार?, पंकजा मुंडे यांचं पक्षात स्वागत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.

अशातच भाजपात तुम्ही अस्वस्थ आहात का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना “मी भाजपात अस्वस्थ नाही. मी सध्या सामान्यपणेच अस्वस्थ आहे. कारण माझ्या परिस्थितीत इतर कुणालाही ठेवलं तर तो माणूस अस्वस्थ होईलच किंवा तो आणखी काय करेल? हे माहीत नाही. पण मी कणखरपणे उभी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं , पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर, म्हणाले…

राज्यातल्या एका मोठ्या नेत्यांच्या पंकजा मुंडे कन्या आहेत, बहुजन वर्गातल्या आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण, भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना किती स्थान दिलं जातं. महिलांना किती प्रोत्साहन दिले जाते हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे पंकज मुंडे काही भूमिका घेत असतील तर त्याचा नक्कीच विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे. अन्यथा, पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असतील तर त्यांचं स्वागत करू , अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी निवडणुक लढविणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र, खासदार सुप्रिया ताई यांच्या विरोधामध्ये नेमकं कोण रिंगणात उतरतोय हे पहावं लागेल असा टोलाही महेश तपासे यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लिलावती रूग्णालयात केलं दाखल”

मी अस्वस्थ आहे कारण…; भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची राज्यस्तरीय परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न