Home महाराष्ट्र महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं , पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर, म्हणाले…

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं , पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर, म्हणाले…

202

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणावरून मोठं विधान केलं होतं. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नाईलाजाने महिला आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागला. यापूर्वी महिलांना आरक्षण देण्याचा विचार देशात कुणीच केला नव्हता, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

1992-93 ला देशात आणि राज्यात महिलांना सर्व प्रथम आरक्षण आम्हीच दिलं. लष्कर, नौदल आणि हवाई दलातही आरक्षण आम्हीच दिलं आणि महिलांसाठी धोरण राबविणारं सर्वात पहिलं राज्य महाराष्ट्रच होतं, तसेच कदाचित पंतप्रधानांना चुकीचं ब्रिफिंग केलं गेलं असावं, असा टोलाही शरद पवारांनी यावेळी मोदींना लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लिलावती रूग्णालयात केलं दाखल”

काँग्रेस आणि इतर लोकांनी नाईलाजाने महिला आरक्षण विधेयकाला सपोर्ट केल्याचं मोदी म्हणाले. पण ही वस्तुस्थिती नाही. इतक्या वर्षात यांना काही करता आलं नाही. हा विचारही करता आला नाही असं मोदी म्हणाले ते योग्य नाही, असंही शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

मी अस्वस्थ आहे कारण…; भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची राज्यस्तरीय परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न

पंकजा मुंडे ही भाजपची लेक नाही का? ; सुप्रिया सुळे यांचा भाजपाला परखड सवाल