आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशा शब्दांत पडळकरांनी हल्लाबोल केला. या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “सांगलीत, रविवारी मराठा क्रांती मोर्चाची हाक, आदर्शवत मोर्चासाठी बैठकांचा जोर”
भाजपने निर्माण केलेले नेते गरळ ओकत आहेत. खालच्या पातळीवर जाऊन राजकीय वक्तव्यं करत आहेत. त्यांची बौद्धिक क्षमता नसल्यामुळे जे मनाला येईल आणि बुद्धीला सुचेल, असं ते बोलत आहेत. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, भाजपचे छोटे नेते बोलत असताना भाजपचे मोठे नेते शांत बसतात. यातून एकच निष्कर्ष निघू शकतो, भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा या छोट्या नेत्यांना पाठिंबा आहे. , असा आरोप रोहित पवारांनी यावेळी केला. ते अहमदनगरमध्ये एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, “हे छोटे नेते (गोपीचंद पडळकर) शरद पवार किंवा सुप्रिया सुळे किंवा त्यांच्याबरोबर सत्तेत असणारे नेते अजित पवार यांच्याबद्दलही बोलले. पण एवढं बोलूनही अजित पवार गटाचे मोठे नेते शांत आहेत. भाजपाचे अनेक पदाधिकारी शांत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला आश्चर्य वाटतं, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर त्यावेळी मी भाजपमध्ये गेले असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य