आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह अनेक आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवारांचा. यानंतर अनेक घडामोडी घडल्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल सुरू झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला.
ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी साजरा होणार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवारांनी रोहिणी खडसेंच्या नियुक्तीचे पत्र दिलं आहे.
दरम्यान, नियुक्तीचं पत्र मिळाल्यानंतर, रोहिणी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार फौजिया खान यांच्या आभारी आहे. महाराष्ट्रात महिलांचं संघटन वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल., असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
सांगली आकाशवाणी केंद्राचे सतारवादक उस्ताद रफीक नदाफ काळाच्या पडद्याआड
“सत्तेत सहभागी होण्यासाठी, शरद पवारांनीच मार्गदर्शन केलं; ‘या’ आमदाराच्या वक्तव्याने खळबळ”
“मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, तर…”