आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बारामती | राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी अजित पवार यांचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी भाषण केलं.
खरंतर आज मला प्रश्न पडलाय की, मी बारामतीकरांसमोर काय बोलायचं? असा प्रश्न कधी याआधी पडला नव्हता.आज जो काही आहे जसा काही आहे तो बारामतीकरांमुळे आहे, बारामतीकरांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. मी आपल्याशी नेहमी सारखा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
ही बातमी पण वाचा : मविआ सरकारच्या काळात, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट
मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मलाही माहिती आहे की, मी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही”, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, आपण कामे करु. सुदैवाने तिजोरी आपल्या हातात आहे. आपण सगळ्या तालुक्यांचे काम करु. आपण आज जिल्हा आणि तालुक्यात अनेक विकासकामे करत आहोत, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून आत्तापर्यंत मनसेशी युती केली नाही; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण
शरद पवार यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, केंद्र सरकारने…
“पवार काका-पुतण्यांमुळे डोकं फुटायची वेळ येईल; ‘या’ आमदाराचं विधान चर्चेत”