मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सोनूच्या सूदच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून मनसेने संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसंच राऊत यांना आव्हान देखील दिलं आहे.
राऊतसाहेब सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकतर आपल्या टेस्ट होत नाहीत. टेस्ट झाल्या तर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिका मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही…. आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे… प्रायव्हेट वाले वाटेल ते बील आकारतायेत…अशी सध्या रुग्णांची अवस्था आहे. मला असं वाटतं आपण ही जर रुग्णांची अवस्था सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता, असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले.
दरम्यान, जर तुम्ही कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलं, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
तर नक्कीच सामना वर येऊन पाया पडीन pic.twitter.com/WPdAGXEQFR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मनसेची आजची राज्यातील परिस्थिती बिकट- अशोक चव्हाण
तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणून…; राम कदमांचं संजय राऊतांवर टीकास्त्र
आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही; सोनू सूदसाठी भाजपा प्रवक्त्याचं भावनिक पत्र
“पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज”