Home महाराष्ट्र “शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर”

“शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर”

मुंबई : चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. 9 जूनला रायगड आणि 10 जून रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

चक्रीवादळाचा तडाखा हा सर्वाधिक बसला तो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला. अनेक शेतकऱ्यांचं आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौरा केला. त्यांनी तातडीने 100 कोटींची मदत जाहीर केली. आता शरद पवार हे उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर जात आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा रायगड दौरा केला तेव्हा त्यानंतर लगेचच त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये एक तातडीची बैठक झाली होती. कोकणातल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा कसं उभं करायचं यावर चर्चा झाली. त्यामुळे शरद पवारांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे”

मनसेची आजची राज्यातील परिस्थिती बिकट- अशोक चव्हाण

तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणून…; राम कदमांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही; सोनू सूदसाठी भाजपा प्रवक्त्याचं भावनिक पत्र