आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती, तसेच भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा, त्यांचे इतर घोटाळे बाहेर काढायला हवेत. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक ट्विट; म्हणाल्या, तुफानाला तोंड द्यायला…
हा-बारा दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही आरोप केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे आरोप केले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, त्या आरोपांमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे काही आरोप केले असतील, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा आणखी काही असेल, त्यावर त्यांनी कारवाई करावी., असं शरद पवार म्हणाले. ते येवल्यातील जाहीर सभेत बोलत होते.
माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल., असं आवाहन शरद पवारांनी यावेळी पंतप्रधान मोदींना यावेळी दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांच्या शपथविधीआधी 30 जूनला नेमकं काय घडलं?; प्रफुल्ल पटेलांनी सांगितली आतली बातमी, म्हणाले…
…तर हा देखील मोठा गुन्हा आहे; पंकजा मुंडेंचा, देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
भारत विरूद्ध पाकिस्तान सामना, हिंदुस्तानात व्हावा हे न पटणारं; मनसेची संतप्त प्रतिक्रिया