आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई | महाराष्ट्रात रविवारी 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप घडला.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे आणि मोठे नेते उपस्थित होते.
अमोल कोल्हे यांनी काल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे अमोल कोल्हे शरद पवार यांच्यासोबत आहेत की अजित पवार? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ही बातमी पण वाचा : भाजपाच हिंदुत्व बेगडी; अजित पवार यांच्यासोबत असलेल्या या नेत्याचं मोठं वक्तव्य
अमोल कोल्हे यांनी ट्विरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओद्वारे त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
“जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है. पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत”, असं कोल्हेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय तो…; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
“मोठी बातमी !राष्ट्रवादीनंतर आता ‘या’ पक्षातही धमाका होणार?”
अजित पवारांच्या बंडावर, उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन, म्हणाले…