Home पुणे अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय तो…; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय तो…; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : अजित पवार यांनी बंड करत राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी जो निर्णय घेतलाय. तो निर्णय सर्वसामान्य लोकांना मान्य नाही. सर्वसामान्य मतदार यामुळे दुखावला गेला आहे. आपण मतदान करून चूक केली का? अशी भावना जनतेच्या मनामध्ये आहे. त्यामुळे राजकारणात येऊन चूक केली का असं मलाही वाटतं, असं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी !राष्ट्रवादीनंतर आता ‘या’ पक्षातही धमाका होणार?”

आपली खुर्ची टिकवण्यासाठी लोक प्रयत्नशील आहेत. यातच सगळे गुंतून आहेत. जनतेच्या प्रश्नांविषयी बोललं गेलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे मनात विचार येतो की राजकारण करायचं की नाही… पण एक गोष्ट मनात कायम आहे. महाराष्ट्र लढत राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या रक्तात लढणं आहे. त्यामुळे तोच विचार पुन्हा बळ देतो, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराडला जाणार आहेत. महाराष्ट्राचे पहिले यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र त्याआधी पुण्यातील मोदी बागेच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिरूर तालुक्यातील पहिला कार्यकर्ता मोदी बागेत उपस्थित आहे. पुणे शहरातील पदाधिकारी मोदी बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. रोहित पवारही तिथे दाखल झाले आहेत. तिथे रोहित पवार माध्यमांशी बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवारांच्या बंडावर, उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन, म्हणाले…

अजित पवार निधी देत नाहीत, तर मग युतीत कसे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

अजित पवारांच्या बंडावर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या…