Home महाराष्ट्र “आता ठाकरे बंधू एकत्र येणार?; मनसेच्या बैठकीत मनसैनिकांचा राज ठाकरेंसमोरच सूर”

“आता ठाकरे बंधू एकत्र येणार?; मनसेच्या बैठकीत मनसैनिकांचा राज ठाकरेंसमोरच सूर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : अजित पवार यांनी बंड करत राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले…मी शरद पवारांसोबत

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर मनसेच्या नेत्यांनी या बैठकीत घेतला. तसेच आज मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर लावण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणावर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली.

आजच्या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. ज्या पद्धतीचरे राजकारण होत आहे, त्यावर चर्चा झाली. ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी आमच्या पक्षातील सर्वांची आणि महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. पण याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील., असं बाळा नांदगावकर म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपाच हिंदुत्व बेगडी; अजित पवार यांच्यासोबत असलेल्या या नेत्याचं मोठं वक्तव्य

अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय तो…; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

“मोठी बातमी !राष्ट्रवादीनंतर आता ‘या’ पक्षातही धमाका होणार?”