भाजपच्या ‘या’ महिला आमदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला; चर्चेला सुरुवात

0
1011

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट घेतली. सध्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे सत्र सुरू झाले. सीमा हिरे व सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हिरे समर्थकांत तो चर्चेचा विषय होता.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; कोकणातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दौऱ्यांमध्ये शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन नगरसेवकांची हजेरी दिसून आली. या नगरसेवकांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सीमा हिरे यांनी मुंबईत सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर हिरे यांच्या समर्थकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, याबाबत खासदार सुळे व आमदार सीमा हिरे यांचा फोटो व्हायरल करणाऱ्या भाजप युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष सुशील नाईक यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी बुधवारी एका कामानिमित्त ही भेट झाल्याचे सांगितले. ही भेट राजकीय नसल्याचं  स्पष्टीकरण सुशील नाईक यांनी दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही- नितेश राणे

“मेघालयमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह 11 आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश”

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीवर मनसेच्या ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया; चर्चेंना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here