आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता, तर त्यांचा खून झाला होता, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. यावर आता ठाकरे गटाचे नेते तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “क्षुल्लक कारणावरून, शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा…; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”
आनंद दिघे यांचं, निधन झालं तेंव्हा मी दिल्लीत होतो. त्यानंतर मी आणि राम नाईक आम्ही दिघे साहेबांच्या अत्यंयात्रेला आलो होतो. आम्हांला माहितीपण नव्हतं की तिथे कोण होतं. शेवटच्या क्षणी तिथे कोण होतं. तो सगळा संशोधनाचा विषय आहे., असं खैरे म्हणाले.
बरेचसे लोक, शिवसैनिक म्हणतात ते, एकनाथ शिंदेंचं कारस्थान असू शकतं. आता त्याची चौकशी केली पाहिजे. दिघे साहेबांबरोबर आम्ही काम केलं आहे. एक जबरदस्त माणूस होता. ते तुरुंगात गेले तेंव्हा अगदी शाळकरी मुलांनीदेखील त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता., असंही खैरेंनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, ते तुरुंगात कसे गेले, तर एका गद्दार नगरसेवकाने शिवसेनेशी गद्दारी केली होती. त्यावेळी शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार होता, त्याला त्या नगरसेवकाने पाडलं होतं. एका मताने शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही. त्यानंतर दिघे साहेब चिडले. तो माणूस (विरोधात मत देणारा नगरसेवक) संपला नंतर.., दिघे साहेबांना त्यात अटक झाली होती., असं खैरे यावेळी म्हणाले.