आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सातपैकी सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले असले तरी वर्धा समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ऐनवेळी बिनसलं आहे.
महाविकास आघाडीत ठरल्यानुसार सभापतीपदांचे वाटप झाले. मात्र वर्धा बाजार समितीच्या सभापतीसाठी ऐनवेळी काँग्रेसने भूमिका बदलली.
ही बातमी पण वाचा : अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत; राज ठाकरेंचा टोला
काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे संयुक्त पॅनल निवडून आलं. ठरल्यानुसार देशमुख गटास सभापतीपद तर कांबळे गटास उपसभापतीपद मिळणार होते. देवळी बाजार समितीत या सूत्रानुसार वाटप झालं. मात्र संचालकांचे बहुमत असणाऱ्या कांबळे गटाने सभापतीपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे ऐन मतदानाच्या तासभरापूर्वी लक्षात आलेल्या देशमुख गटाने ही तडजोड नाकारली.
महत्त्वाच्या घडामोडी –
निवडणूकीत देवाला आणलं, तरी पराभव झाला, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजपला टोला
तब्बल 9 तासांनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताच, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
लोकशाही मान्य नसलेला पक्ष म्हणजे भाजप; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात