Home महाराष्ट्र पालघर घटनेचं राजकारण करू नका; शरद पावारांच आवाहन

पालघर घटनेचं राजकारण करू नका; शरद पावारांच आवाहन

मुंबई : पालघरमधील एका गावात गुरूवारी रात्री लोकांनी 3 साधूंना ठार मारल्याची घटना घडली. यावर पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पालघरमध्ये घडलेली घटना आणि करोनाचा काहीही संबंध नाही. पालघरवरून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र बनवलं जात आहे. पालघरमधये जे काही झालं त्याचा कशाशी संबंध असेल तर त्याचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, घटना घडल्यानंतर काही तासातच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली. अशी प्रकरणं घडायला नको. ते निषेधार्ह आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र

सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील

सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत- नारायण राणे

“पालघरमधील घटना ही लज्जास्पद; आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल”