आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते.
तसेच याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी 25 कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. तसेच या प्रकरणावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “निवडणुकीला आम्ही नाही तर भाजप घाबरते”
वानखेडेंबाबत नवाब मलिक सातत्याने बोलत होते ते कसं आता खरं व्हायला लागलंय ते बघा. हे सगळं दुर्दैवी आहे. शाहरुख खानसारख्या मोठ्या फिल्मस्टारच्या मुलाचे असे हाल होत असतील तर या देशातील सर्वसामान्य जनतेच्या पोरांनी काय करावं? मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार आहे. केंद्र सरकारला विनंती आहे की, तुम्ही ईडी, सीबीआय काय वापरता ते वापरता. परंतु लोकांच्या घरात घुसून त्यांच्या मुलांवर अन्याय करू नका., असं सुप्रिय सुळे म्हणाल्या.
दरम्यान, राजकारण इतकंही गलिच्छ होऊ नये, असं मला वाटतं. लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर अशा प्रकारचा अन्याय होणं अतिशय चुकीचं आहे, हे सगळं दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राला आणि देशाला लाजवणारी गोष्ट आहे., अशी खंतही सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“सोलापूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
…म्हणून शिवसेना-भाजप युती राहिली नाही; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान
‘…तर मी विधानसभेचा राजीनामा देईन’; आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान