आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी घाम आणि पैसा गाळूनदेखील कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव होईल आणि हा 2024 या वर्षासाठी शुभ संकेत असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : सत्तासंघर्षाच्या निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार?; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट विधान, म्हणाले…
पंतप्रधान मोदी हे देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत असून त्यांच्यावर बोलण्याची, संजय राऊत यांची लायकी नाही, असं जोरदार प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना यावेळी दिलं. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
सर्वज्ञानी संजय राऊत जी सर्व देशवासियांना माहिती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी जीं नी कशासाठी घाम गाळला. मोदीजींनी घाम गाळला कलम ३७० हटवण्यासाठी, राम मंदिर बनवण्यासाठी, देशभर चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, परदेशात भारताचा लौकिक वाढविण्यासाठी… आणि सर्वज्ञानी संजय राऊतांनी घाम गाळला पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी… मराठी माणसाला लुटण्यासाठी… बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी… कोविडमध्ये कंत्राटं घेऊन कमावण्यासाठी… गैरमार्गानं आलेले २५ लाख भरण्यासाठी… मोदीजी गरीबांचं कल्याण करण्याबरोबरच देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळताहेत. तुमची लायकी पण नाही त्यांच्यावर बोलायची. बाकी टिका करणारे “भौंकते रहते है और हाथी चलता है !” , असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सर्वज्ञानी संजय राऊत जी सर्व देशवासियांना माहिती आहे,
पंतप्रधान @narendramodi जी नी कशासाठी घाम गाळला.
मोदीजींनी घाम गाळला कलम ३७० हटवण्यासाठी,
राम मंदिर बनवण्यासाठी,
देशभर चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी,
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी
परदेशात भारताचा लौकिक…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 10, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
“कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसची किती जागांवर मुसंडी?”
“एकनाथ शिंदे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री”
“सुषमा अंधारेंनी फक्त एक दिवस राज ठाकरेंसमोर बसावं, मग त्यांना कळेल की…”