आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लखनऊ : आयपीएलचा आजचा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध लखनाै सुपर जायंट्स लखनऊचा 18 धावांनी पराभव केला.
आजच्या सामन्यात बेंगलोरने टाॅस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरने पहिला फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट गमावत कवळ 126 धावा केल्या. बेंगलोरकडून कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने 40 चेंडूत 1 चाैकार, 1 षटकारासह 44 धावा केल्या. विराट कोहलीने 30 चेंडूत 3 चाैकारांसह 31 धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने 11 चेंडूत 1 चाैकार, 1 षटकारासह 16 धावा केल्या. तर लखनाैकडून नवीन उल हकने सर्वाधिक 3, तर रवी बिश्नोई व अमित मिश्राने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ही बातमी पण वाचा : …आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना लखनाैचा संघ निर्धारित 19 .5 षटकात सर्वबाद 108 धावाच करू शकला. लखनाैकडून कृष्णाप्पा गाैतमने 13 चेंडूत 1 चाैकार, 2 षटकारांसह 23 धावा केल्या. तर अमित मिश्राने 30 चेंडूत 2 चाैकारांसह 19 धावा केल्या. मात्र लखनाैचा इतर फलंदाजांनी निराशा केली. तर बेंगलोरकडून जोश हेझलवूड, कर्ण शर्माने 2, तर हर्षल पटेल, मोहम्मद सिराज व वानिंदू हसरंगाने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
…आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान
मोठी बातमी! उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट; माध्यमांना सांगितलं भेटी मागचं कारण
“…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”; बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान