Home महाराष्ट्र …आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान

…आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आपण लवकरच सत्तेत असू आणि आपली कामे आता 50 टक्के नाही तर 100 टक्के पूर्ण होतील, असं मोठं विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावेळी केलं.

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात, सर्व प्रश्न लवकरच दूर होईल आणि आपण सत्तेत असू असं म्हटलं होतं. अशातच आता अमित ठाकरेंनीही असंच मोठं विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मनसेचा कामगार मेळावा आज मुंबईत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट; माध्यमांना सांगितलं भेटी मागचं कारण

आज मी येथे कामगार सेनेची ताकद बघायला आलो आहे. तुम्ही उगाच माझे नाव घेता. जे काही आहे ते सगळे तुमचे सगळ्यांचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणता की, 50 टक्के कामे होतात, 50 टक्के कामे होत नाहीत. पण खात्री बाळगा आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामे पूर्ण होतील असा मला पूर्ण विश्वास आहे, असा दावा अमित ठाकरेंनी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”; बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान

अडीच वर्षात दमडी सुद्धा या ठाकरे सरकारने फेकून मारलेली नव्हती; भाजप नेत्याची टीका

आता तरी, लोकांना खात्री पटली की, राष्ट्रवादीनंच शिवसेना संपवली; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा