लखनऊ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून कामगार व मजुर त्यांच्या राज्यांमध्ये परतत आहेत.
घरी परतणाऱ्या कामगारांची मदत करण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती समोर येत आहेत. या लॉकडाउनच्या काळात उत्तर प्रदेशात आपल्या घरी अडकलेल्या क्रिकेटपटू मोहम्मद शमीने या कामगारांची मदत करण्याचं ठरवलं आहे.
मोहम्मद शमीने आपल्या सहकाऱ्यांसह घराजवळील जागेत मदतकार्याचा मंडप लावलेला आहे. घरी जाणाऱ्या कामगारांना शमी फळं, जेवणाचं पाकीट आणि पाण्याची बाटली अशी मदत करतो आहे. बीसीसीआयनेही मोहम्मद शमीच्या या मदतकार्याचं कौतुक केलं आहे.
As #IndiaFightsCorona, @MdShami11 comes forward to help people trying to reach home by distributing food packets & masks on National Highway No. 24 in Uttar Pradesh. He has also set up food distribution centres near his house in Sahaspur.
We are in this together pic.twitter.com/gpti1pqtHH
— BCCI (@BCCI) June 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अजब तुझे सरकार ; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
“मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव”
केरळ सरकारने महाराष्ट्राला केली ‘ही’ मोलाची मदत; मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार
ग्राहकांसाठी Jio ची खास ऑफर, दररोज मिळणार ‘इतका’ डेटा फ्री