मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

0
167

मुंबई :  भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी रुग्णालयात कार्यरत होते. 2016 मध्ये चार लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी किशोर वाघ यांना अटक झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये किशोर वाघ यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे किशोर वाघ दोषी असल्याचा अहवाल देण्यात आला होता.

दरम्यान, त्यानंतर किशोर वाघ यांच्यावर निलंबन वगळता इतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर बसू शकला असता का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

“संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही, पण…”

अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा ‘मोठा’ खुलासा

मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here