Home महाराष्ट्र “मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव”

“मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव”

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यांमध्ये परतले आहेत. यावरून  मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे.

मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज यांचा स्वभाव आहे, असं म्हणत नितीन सरदेसाई यांनी एक पोस्ट केली आहे. प्रकाश’ हे दादरच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीतील एक मानाचं पान… लॉकडाऊन दरम्यान मागील 70 दिवस बंद असलेलं हे उपाहारगृह फक्त पार्सल करीता सुरु झालं आणि पहिल्याच दिवशी या उपाहारगृहातून माझ्या घरी पार्सल आलं. आश्चर्य वाटलं… नंतर कळलं की राजसाहेबांनी माझ्यासह त्यांच्या अनेक मित्र व स्नेही यांच्याकडे अशीच पार्सलं पाठवली, असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील परप्रांतीय राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधी महाराष्ट्रातील तरूणांपर्यंत पोहोचवाव्या. त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल, अशी सूचना राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सरकारला केली होती.

https://www.facebook.com/sardesaimanase/posts/3222613834467462

महत्वाच्या घडामोडी-

केरळ सरकारने महाराष्ट्राला केली ‘ही’ मोलाची मदत; मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

ग्राहकांसाठी Jio ची खास ऑफर, दररोज मिळणार ‘इतका’ डेटा फ्री

ATKT असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य