रामदास आठवले महायुतीवर नाराज? म्हणाले, “मी आणि माझे कार्यकर्ते…”

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. आज झालेल्या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री असणार आहे. मात्र, या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला संधी मिळाली नाही. यावरून रामदास आठवले यांनी महायुतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

“मी नाराज आहे आणि माझे कार्यकर्तेही नाराज आहे”,अशा शब्दांत रामदार आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : कला विश्वावर मोठी शोककळा; प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन

“देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांनी अनेकवेळा आम्हाला एमएलसी आणि मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विधानसभा निवडणुकीत सांगितलं होतं की जागा देत नसाल तर आम्हाला मंत्रिमंडळात पहिल्यांदा सन्मान द्या. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी सांगितलं होतं की, तुम्हाला मंत्रिपद देऊ. मात्र अडीच वर्ष मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; वाचा यादी!

पुण्यातील गोपाळकृष्ण विद्यामंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, पत्नी अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here