Home क्रीडा निवृत्तीनंतर शिखर धवन दिसू शकतो ‘या’ भूमिकेत

निवृत्तीनंतर शिखर धवन दिसू शकतो ‘या’ भूमिकेत

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू सध्या लॉकडाउनमुळे आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही भारतीय खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारत क्रिकेटचा माहोल कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी नुकत्याच इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारल्या. यात शिखर धवनने आपल्या निवृत्तीनंतरच्या योजनेबद्दल सांगितलं.

माझी विनोदबुद्धी खूप चांगली आहे. ज्या दिवशी मी समालोचनाकडे वळेन, मला खात्री आहे की मी त्यात चांगली कामगिरी करेन. विशेषकरुन हिंदीमध्ये लोकांना हसवणं हे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. मी हे काम सहज करु शकतो, असे शिखरने अश्विनशी गप्पा मारताना आपला प्लान सांगितला.

दरम्यान, लॉकडाउन काळात शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. आपली पत्नी, मुलं यांच्यासोबत डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सर्व क्रिकेट सामने बंद असल्यामुळे भारतीय खेळाडू पुन्हा कधी मैदानात उतरतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आता मुंबईत अमिताभ, शाहरुखऐवजी तुझ्या घरासमोर गर्दी होणार; सोनू सूद म्हणतो…

…या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांच भाजपला आव्हान

…पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण