Home महाराष्ट्र …या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण

…या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : मुंबईत विमानानं दररोज 16 हजार लोक येत होते. म्हणजेच लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी किती प्रवासी आले असावेत? त्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याऐवजी होम क्वारंटाइन करण्यात आलं. मात्र त्यांनी कोरोनाचा प्रसार अधिक केला आहे. या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

मुंबईतील धारावी ही जगातील सर्वात जास्त घनता असलेली वस्ती आहे. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच पालन करणं शक्य नाही. त्या ठिकाणी केवळ लोकांची चाचणी करणं हाच एक उपाय आहे. राज्य सरकार कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चाचणी करत आहे. टेस्टिंग किट्ससाठीही केंद्र सरकारकडून मदत मिळत नाही. तरीही आम्ही सर्वाधिक चाचण्या करत आहोत आणि त्यामुळेच रुग्णांची सर्वाधिक संख्या सापडत असल्याचं चव्हाण म्हणाले.

दरम्यान, “इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. राज्य सरकार ज्या परिस्थितीत या सर्वांना सामोरं जात आहे निश्चितच ते चांगलं काम करत आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांच भाजपला आव्हान

…पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

भाजप हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला पडलाय- जयंत पाटील

देवेंद्र फडणवीसांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये- जयंत पाटील