Home महाराष्ट्र …पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

…पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : मध्यंतरी भाजपाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एक तर मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री राज्यपालांना जाऊन भेटले. त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जाहीर मागणीही केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपाच्या कारवाया सुरू होत्या हे उघड आहे, असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.

मध्यप्रदेशात जे घडलं, तसंच कर्नाटकात जे घडलं ते महाराष्ट्रात करायचा त्यांचा प्लॅन होता. पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही. त्यांची गोळाबेरीज करून ११८ च्या जवळपास संख्या आहे. कर्नाटक मॉडेल महाराष्ट्रात चालणार नाही म्हणून इतर मार्गांचा वापर करण्यात आला, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर सरकारची पाडापाडी केली तर ते लोकांना आवडणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही असं काहीही करणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच नारायण राणे जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तीक मत होतं. त्याला अधिकृत मान्यता नव्हती. परंतु ती होती का नव्हती हे त्यांनाच माहित, असंही चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला पडलाय- जयंत पाटील

देवेंद्र फडणवीसांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये- जयंत पाटील

खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

“त्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…”