Home महत्वाच्या बातम्या करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता- उद्धव ठाकरे

करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता- उद्धव ठाकरे

मुंबई : करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते लोकसत्ता या वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत बोलत होते.

करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. करोनानंतरचं जग बदलेलं असेल. करोनासोबत जगायचं म्हणजे आपल्याला लाईफस्टाईल बदलावी लागणार आहे. आता आपल्याला हळूहळू बंदी उठवावी लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा लॉक सोबत घेऊन फिरा असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटाझर वापरणं असे उपायदेखील आपल्याला करावे लागणार आहेत. सध्या शक्य-अशक्य अशा अनेक गोष्टी आहेत,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही”

आता मुंबईत अमिताभ, शाहरुखऐवजी तुझ्या घरासमोर गर्दी होणार; सोनू सूद म्हणतो…

…या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांच भाजपला आव्हान