आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? फुले आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या होत्या, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आज त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली.
आज चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. अचानक झालेल्या शाईफेकीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
हे ही वाचा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलं, थेट अमित शहांना दिलं आव्हान?; म्हणाले…
पोलिसांनी लागलीच शाईफेक करणाऱ्यासह एकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेमुळे सध्या पिंपरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली.
महत्त्वाच्या घडामोडी –
वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मोरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…
48 तास संपलेत, गेलात काय कर्नाटकात, की फक्त कर नाटक; शिंदे गटाचा, पवारांना टोला
मी मिटिंगसाठी स्मशानात येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही; वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य