मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदारानंतर आता अजित पवार गटातील ‘हा’ आमदार देणार राजीनामा?

0
161

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

हेमंत पाटील यांनी अशाप्रकारे अचानक खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खासदार पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पदाचा राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे.

ही बातमी पण वाचा : जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा – देवेंद्र फडणवीस

हेमंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. माझ्या तालुक्यातील समाज बांधव आणि मराठा समाजाच्या संघटना तसेच जसं सांगतील तसा निर्णय मी घेणार आहे. त्यांनी राजीनामा द्यायला सांगितला तर माझी राजीनामा द्यायची तयारी आहे, असं विधान आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे.

दरम्यान, अतुल बेनके यांच्या विधानानंतर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा, म्हणाले…

“2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट म्हणाले, ठाकरेंनी, पवारांकडे 2 माणसं पाठवली अन्…”

“आमचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here