Home महाराष्ट्र “2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट म्हणाले, ठाकरेंनी, पवारांकडे 2 माणसं...

“2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट म्हणाले, ठाकरेंनी, पवारांकडे 2 माणसं पाठवली अन्…”

111

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांनी भाषणांमधून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंनी तासभर जोरदार भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकेची झोड उठवली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत, मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलं.

ही बातमी पण वाचा : “आमचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे”

दरम्यान, बाळासाहेबांना मी शब्द दिला आहे, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, आम्ही विचारात पडलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार? मात्र हे महाशय टुनकन उडाले आणि खुर्चीत जाऊन बसले. मागचं पुढचं सगळं सोडलं आणि म्हणाले मला कुठे व्हायचंय, पवार साहेबांनी सांगितलं. यांनी पवारांकडे दोन माणसे पाठवली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा, अशी विनंती केली. हे काही लपत नाही., असा गाैफ्यस्फोट एकनाथ शिंदेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्याच्याबद्दल…; शरद पवारांची बावनकुळेंवर बोचरी टीका

मराठा आरक्षण कधी लागू करणार? मंत्री शंभुराज देसाई यांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…

“महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट, चर्चांना उधाण”