आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकाची समिती बरखास्त करावी आणि राज्य सरकारने स्मारक ताब्यात घ्यावं. स्मारकाची देखभाल राज्य सरकारनेच करावी. ठाकरे कुटुंबातील एक-दोन व्यक्तींना समितीवर घ्यावं, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही मागणी भाजपची नाही, कुणी अशी मागणी करत असेल तर ते वैयक्तिक आहे, असं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : “राज्यात आता महाविकास आघाडीचं मोठं शक्तीप्रदर्शन; गांधी-ठाकरे-पवार एकत्र येणार?”
बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं असेल, ते जनतेचंच राहिल, त्याच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये कोण आहे, कोण राहिल, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. शिंदे मुख्यमंत्री असतानाच स्मारकाचं काम पूर्ण होईल, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणावर आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आगामी विधानसभा निवडणूकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ आमदाराने पक्षाला ठोकला रामराम
ब्राम्हण असल्याचा गर्व, परंतु आम्हांला मार्केटिंग करता येत नाही- अमृता फडणवीस