आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची सुरक्षा, शिंदे सरकारने काल काढण्याचे आदेश दिले. मात्र, काही नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा मात्र आहे तशी ठेवण्यात आली आहे. तसेच काहींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अशातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांचं नाव चर्चेत आलं आहे. कारण नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावरून शिंदे गटातील नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या विधानाना अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे ही वाचा : …तर मी ‘त्या’ शिवसैनिकांना घरात घुसून मारेन; मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा
मिलिंद नार्वेकर हे प्रत्येक माणसाला मदत करणारे व्यक्ती आहेत. मला शिवसेनेत आणण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांनीच प्रयत्न केले होते. एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी शिवसेनेत असताना मदत केली आहे. त्यामुळे मिलींद नार्वेकर यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असं उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच उदय सामंतांच्या या विधानामुळे नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार का?, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
बच्चू कडूंसह धनुष्यबाणावर निवडून आलेले 8 आमदार आमच्या संपर्कात; ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट
…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य
…तर यावर एकच उपाय, तो म्हणजे डॉ. शिंदे साहेब; मंत्री शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना टोला