आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या काही महिन्यांपूर्वी जोरधार विरोध केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आता मनसेकडून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
अशातच काल दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी दिवाळी असल्यानं सर्वत्र जोरदार दिवाळी साजरी करण्यात आली. रात्रभर फटाके उडत असल्याने एका व्यक्तीने ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. यावरून आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मनसेसोबत युती करायची असेल, तर…”
ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, असा इशारा अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला.
ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 25, 2022
दरम्यान, सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे 4.30 वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यात आल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या घडामोडी –
आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणार नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य
ते मैदानात जिंकले, अन् तुम्ही मात्र…; ठाकरे गटातील खासदाराचा शिंदेंना टोला