Home महाराष्ट्र सत्तेसाठीभाजप वाट्टेल ते करतं; सामनातून भाजपवर टीका

सत्तेसाठीभाजप वाट्टेल ते करतं; सामनातून भाजपवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार सध्या युती सरकारमध्ये सामील झालेत. अजित पवार यांच्याकडे राज्याचं उपमुख्यमंत्रिपद आहे. शिवाय त्यांच्या समर्थक आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींवरून सामनामधून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. देश बुडवणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र, या शीर्षकाखाली आजचं रोखठोक सदर प्रसिद्ध झालं असून “देशातील भाजप विरोधक हे देशबुडवे आहेत, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी भोपाळमधून केला व पुढच्या 72 तासांत महाराष्ट्रातील देशबुडव्यांनी भाजपशी हातमिळवणी करून मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची भाजपची तयारी दिसते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांचे पक्ष फोडण्याची त्यांना चटक लागली आहे, असं सामनातून म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : “न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, मै तो…”

दरम्यान, देश बुडविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा!” असा आदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे दिला आणि पुढच्या 72 तासांत आपला देश बुडविणारयांपैकी महाराष्ट्रातील अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन ‘पवित्र’ करण्यात आले. याआधी असे अनेक ‘देशबुडवे’ भाजपने पवित्र करून घेतले, असा घणाघातही सामनातून भाजपवर करण्यात आला आहे.

मुश्रीफ हे तात्पुरत्या जामिनावर बाहेर होते. तेही आता अजित पवारांबरोबर भाजपच्या गोटात गेले व मंत्री झाले. छगन भुजबळ यांच्याविरुद्ध मोहीम राबवणारे स्वतः फडणवीस व सोमय्या हेच होते. वळसे-पाटील, धनंजय मुंडेही गेले. भाजपात सामील झाल्यामुळे या सगळ्यांना आता शांत झोप लागेल. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय हत्यारासारखा सुरू आहे. पाकिटमारांना आत टाकायचे व दरोडेखोरांना भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करायचे असे एकंदरीत धोरण आहे. कालचे देशबुडवे एका रात्रीत देशभक्त कसे होतात ते महाराष्ट्रात दिसले!, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…”

शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला का?; शालिनीताई पाटील यांचं सर्वात मोठं विधान, म्हणाल्या…

राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट