Home नाशिक “न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, मै तो…”

“न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, मै तो…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंड करत 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यावेळी बोलताना तुमचं वय आता 83 झालं आहे. तुम्ही थांबणार आहात की नाही? असं अजित पवार शरद पवारांना म्हणाले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, असं शरद पवार म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज शरद पवार नाशिकमध्ये पहिल्यांदा जाहीर सभा घेणार आहे. तत्पूर्वी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पवार बोलत होते.

ही बातमी पण वाचा :“राष्ट्रवादी पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…”

“पंतप्रधान असताना मोरारजी देसाई यांचं वय 84 होतं. तरी ते खूप काम करायचे. त्याचबरोबर आत्ताच्या मंत्रिमंडळात 70 च्या वर वय असलेले अनेक मंत्री आहेत. त्यामुळं न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची विठ्ठलाशी तुलना केली होती. यावर “विठ्ठल हे राज्यातील जनसामान्यांचं श्रद्धास्थान आहे. सामान्य जनता उन्हातान्हात जाऊन विठ्ठलाचं किंवा त्याच्या कळसाचं दर्शन घेतात. त्यामुळं अशा पद्धतीची तुलना करणं योग्य नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

 शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला का?; शालिनीताई पाटील यांचं सर्वात मोठं विधान, म्हणाल्या…

 राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवकचा पक्षाला राम राम